कोल्हापूरच्या मंदिरातील हत्ती महादेवी (म्हणजेच माधुरी) प्रकरणात, अनंत अंबानी यांच्या वनतारा उपक्रमाने एक आगळीवेगळी आणि संवेदनशील भूमिका घेत, लोकभावना, मठाचे नेतृत्व आणि प्राणी कल्याण या तिन्हींचा सन्मान करणारा एक अनोखा मार्ग सुचवला आहे.
महादेवीप्रती कोल्हापूरच्या जनतेचे आणि जैन मठाचे असलेले भावनिक नाते ओळखून आणि तिच्या तातडीच्या वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन, वनताराने नांदणी परिसरात खास हत्तींसाठी एक सॅटेलाईट पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. भारतात अशा प्रकारचे हे पहिलेच केंद्र असेल.
ही संकल्पना वनताराच्या काळजीपूर्वक विचार केलेलेल्या, वैज्ञानिक आधार असलेल्या पुनर्वसन प्रक्रियेची आणि परंपरेच्या सन्मानाची साक्ष आहे. हे केंद्र महाराष्ट्र शासन आणि जैन मठ यांच्या सहकार्याने, तसेच उच्चस्तरीय समितीच्या सल्ल्यानंतर आणि आंतरराष्ट्रीय निकष लक्षात घेऊन विकसित केले जाईल.
अनंत अंबानी यांचा वनतारा उपक्रम आज केवळ हत्तींच्या तात्कालिक गरजांवर उत्तर देत नाही, तर भावनिक संवेदनशीलता, विज्ञानाधारित काळजी आणि सहकार्याने चालणारे प्रशासन यांचा अनोखा मेळ घालून एक काळाची गरज असलेला आदर्श निर्माण करत आहे.
ही सहृदय आणि सन्मानपूर्वक मांडलेली योजना महादेवीच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणारी असून, तिला तिच्या प्रिय कोल्हापुरातील समाजाजवळच ठेवते, ज्या समाजाने तिला नेहमीच जिवापाड प्रेम दिलं आहे.
हे पुनर्वसन केंद्र कोठे उभारायचे हे ठिकाण वनतारा, जैन मठ आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये एकत्रितपणे ठरवले जाणार आहे. अधिकृत मंजुरी आणि जमीन मिळाल्यानंतर वनताराची तज्ज्ञ टीम त्वरित काम सुरू करण्यास सज्ज आहे.
कोल्हापूरच्या या नियोजित केंद्रात महादेवीसाठी आधुनिक आणि सर्वसमावेशक उपचारांची व्यवस्था असेल. त्यामध्ये हायड्रोथेरपी तलाव, पोहण्याची जागा, लेझर थेरपीसाठी खास कक्ष आणि २४x७ पशुवैद्यकीय सुविधा यांचा समावेश असेल. तसेच रात्रभर राहता येईल अशी सुरक्षित शेड, साखळीमुक्त मोकळं निवासस्थान, वाळूत खेळता येईल असे ठिकाण, मऊ गादीसारखी रबरयुक्त जमीन आणि संधिवात व पायांच्या आजारांवर उपयोगी ठरणारी सॉफ्ट सँड माऊंड्स हे सर्वही विशेष वैशिष्ट्ये यात असतील, जे महादेवीच्या हालचाली, आराम आणि आत्मसन्मान यांना बळकटी देतील.