परानुभूती फाउंडेशन देते नजरेतून नवसंजीवनी - वसई विरार पालघर मध्ये दृष्टि रक्षण सोहळा

 


अंधत्व नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी परानुभूती फाउंडेशन द्वारे नेत्र सेवा अभियानाचे आयोजन करण्यात आले असूनवसई-विरार विभाग आणि पालघर जिल्ह्यात नेत्र आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत.

मुंबईअप्रैल 8: आजच्या या धकाधकीच्या  धावपळीच्या जीवनात माणसाचे स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होत आहेत्यात इतर आरोग्याच्या प्रश्नांसह डोळ्यांच्या आरोग्यकडे सुद्धा विशेष लक्ष देणे गरजेचे आहेबऱ्याचदा ते होताना दिसत नाहीनेत्र आरोग्य ही प्रत्येक व्यक्तीसाठी एक महत्त्वपूर्ण बाब असूनडोळ्यांच्या समस्यांमुळे अंधत्वाचा धोका वाढू शकतोयावर उपाय म्हणून परानुभूती फाउंडेशन आणि आयडियल क्युअर्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा सीएसआर उपक्रम या दोहोंच्या संयुक्तविद्यमाने एक महत्वाकांक्षी  व्यापक असे नेत्र सेवा अभियान राबवले जात आहे.

या उपक्रमामधून गरीबमागास  आदिवासीदुर्गम भागगोरगरीब गरजू जनता यांसारख्या नागरिकांना डोळ्यांचे आजार यावर मार्गदर्शन करण्यात येत आहेत्याचप्रमाणे अशा आदिवासी पाड्यांमध्ये या आरोग्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नाहीतत्यामुळे परानुभूती फाउंडेशनने अशा भागांमध्ये आरोग्य सोईसुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार केला आहेया विचारातूनच आरोग्य सेवेचा ध्यास घेऊन परानुभूती फाउंडेशनने नेत्र सेवा अभियानाचे आयोजन केले आहेया अभियानाच्या माध्यमातून वंचित आणि गरजू नागरिकांना तज्ञ डॉक्टरांकडून मोफत डोळ्यांची तपासणीऔषधे आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया वेळेस होऊन त्याचे डोळे वाचवण्यास मदत होत आहे.

या अभियानात परानुभूती फाउंडेशनचे नेत्र सर्जन  संस्थापक संचालक - डॉ गणेश मुंजवालजनरल फिजिशियन  संस्थापक संचालक - डॉप्रविण तळेलेमुख्य समन्वयक - राहुल समिंद्रेनेत्र तपासणी तज्ञ - शीला समिंद्रेपल्लवी आग्रे,  परानुभूती फाउंडेशनचे कार्यकारी संचालक - डॉ भूषण जाधवपरानुभूती फाउंडेशनचे प्रकल्प संचालक - मंगेश राय यांचाही समावेश आहेत्याच प्रमाणे अनेक स्वयंसेवक जसे रागिनी यादवचंदन कांबळेपूजा सोनवणेकिरण मोहंतीकृणाली फडवळेप्रार्थना पेंढारीजे बी सिंगडॉहरीश नागावकरजयेश वीर यांनी मोलाचे योगदान दिले.

तसेच बर्फेश्वर तलाव गार्डन प्रमुख - शरद पाटीलओंकार अंध अपंग संस्था प्रमुख - सुरेश पवाररॉबिन हूड आर्मी प्रमुख - हिमांशू धांडे  इम्तियाज अली , जिल्हा परीषद शाळा वाघराळ पाडा शिक्षिका - कल्याणी मॅडमफिनिक्स फार्म प्रमुख - मुरली नारायण आणि वाडा पोलीस स्टेशन उपनिरीक्षक - दत्तात्रय किंद्रे यांचा कडून विशेष सहकार्य लाभलेत्याचप्रमाणे आनंद गदगी आणि अशीति जोईल या प्रकल्पासाठी मीडिया प्रबंधक म्हणून कार्यरत आहेत.

या प्रकल्पाची नेमकी उद्दिष्टे काय?

परानुभूती फाउंडेशन

परानुभूती फाउंडेशनच्या या उपक्रमांतर्गत १५ नेत्र शिबिरे तसेच अनेक मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रस्तावित करण्यात आल्या आहेतयातील काही प्रमुख सेवा या पुढीलप्रमाणे आहेत:

1. मोफत चष्मे वाटप.
2. 
मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे.
3. 
मोफत आयड्रोप्स आणि औषध वाटप करणे.
4. 
तज्ज्ञ नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टरांकडून उपचार देणे.
5. 
डोळ्यांच्या विविध आजारांबद्दल जागरूकता आणि समुपदेशन करणे.
6. 
शस्त्रक्रियेनंतरची घेतली जाणारी काळजी आणि उपचारांचा पाठपुरावा करणेइत्यादी प्रमुख सेवा योजल्या आहेत.

शिबिराचे नियोजन आणि अंमलबजावणी कशी आहे ते पाहू?

परानुभूती फाउंडेशनने मार्च  एप्रिल २०२५ मध्ये दर आठवड्याला  ते  नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन केले असूनही शिबिरे प्रामुख्याने वसई-विरार आणि पालघर जिल्ह्यातील दुर्गमगरजू ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये घेतली जात आहेतपरानुभूती फाउंडेशनच्या या उपक्रमातून सुमारे २००० पेक्षा जास्त लाभार्थी नेत्र तपासणी आणि उपचारांचा लाभ घेतीलयामध्ये किशोरवयीन मुलेतरुणमहिला आणि वृद्ध व्यक्तींचा समावेश आहेमोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी मोतीबिंदूबाधित रुग्णांची निवड केली जात असून त्यांना समुपदेशनसुद्धा दिले जात आहेयाशिवाय परानुभूती फाउंडेशनने ज्या रुग्णांना विशेष उपचारांची आवश्यकता आहेअशा रुग्णांना उच्च केंद्रांमध्येसुद्धा पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

हा उपक्रम नेत्र आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्याबरोबरच अंधत्व टाळण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेवंचित आणि गरजू नागरिकांना दर्जेदार उपचार आणि नेत्र आरोग्य सेवा मिळावीयासाठी परानुभूती फाउंडेशन आणि आयडियल क्युअर्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा हा सामाजिक उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

अशा प्रकारच्या मोहिमा समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत आणि भविष्यातही अशाच सेवा देण्याचा संस्थेचा संकल्प आहेया उपक्रमातून दृष्टीहीनतेचे प्रमाण कमी करण्यास मोठी मदत होणार आहेया कार्यासाठी परानुभूती फाउंडेशन ला लोकांचा सहभाग अपेक्षित आहेआपण आर्थिक योगदान करून तसेच स्वयंसेवक म्हणून संस्थेला मदत करू शकता.

Previous Post Next Post