स्वच्छ नवी मुंबई अभियानात इनऑर्बिट मॉल्स आणि यशलोक वेलफेअर फाऊंडेशनची नवी मुंबई महानगरपालिकेला मदत

 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सफाई मित्रांसाठी रिफ्लेक्टिव्ह जॅकेटसाठी प्रायोजकत्व

नवी मुंबई : शॉपिंग सेंटर उद्योगातील अग्रगण्य असलेल्या इनऑर्बिट मॉल्सने त्यांच्या सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेला करत आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वात स्वच्छ शहर असलेल्या महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना शहर स्वच्छ ठेवण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'सफाई मित्रां'साठी रिफ्लेक्टीव्ह जॅकेटचे प्रायोजकत्व इनऑर्बिट मॉल्स आणि यशलोक वेलफेअर फाऊंडेशनकडून देण्यात आले आहे. ही जॅकेट्स दृष्टीहीन व्यक्ती, वंचित महिला आणि फाऊंडेशनचा एक भाग असलेल्या तरुणांनी तयार केली आहेत.

नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात या प्रायोजकत्वाची औपचारिकता करण्यासाठी अधिकृत कार्यक्रम संपन्न झाला. अशी एकूण ३१०० जॅकेट्स ‘सफाई मित्र’ किंवा एसडब्ल्यूएम कामगारांच्या वापरासाठी वितरीत करण्यात आली आहेत, ज्याने सध्या सुरू असलेल्या स्वच्छता ऑपरेशन्स दरम्यान त्यांची दृश्यमानता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासोबतच कचरा विलगीकरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यात मदत केली आहे.

यावेळी के रहेजा कॉर्पोरेशनचे ग्रुप सल्लागार किशोर भटिजा; नवी मुंबई महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त महापालिका आयुक्त सुनील पवार, नगर नियोजन (एडीटीपी)चे सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण, पालिकेचे शहर अभियंता शिरीष अरदवाड यांच्यासह इतर प्रमूख पाहुणे यावेळी उपस्थित होते.

हा उपक्रम इनऑर्बिटचे जनतेचे कल्याण आणि शहरी शाश्वततेसाठी बांधिलकी अधोरेखित करतो. ही रिफ्लेक्टिव्ह जॅकेट प्रदान करून, इनॉर्बिट मॉल्स आणि यशलोक फाऊंडेशन एकत्रितपणे नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याला पाठिंबा देतात आणि स्वच्छ, सुरक्षित नवी मुंबईच्या व्यापक ध्येयामध्ये योगदान देतात.

Previous Post Next Post